About Us
आमच्या विषयी
मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयांतर्गत गुन्हे शाखा कार्यरत आहे,
गुन्हे शाखेची संरचना व कर्तव्य याबाबत मा. पोलीस आयुक्त, मिभाववि यांचे स्थायी आदेश कमांक 02/2025, दिनांक 22 ऑगस्ट, 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहे.
पोलीस उप आयुक्त गुन्हे हे गुन्हे शाखेचे प्रमुख आहेत, त्यांच्या अधिपत्याखाली सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रकटीकरण) कार्यरत आहेत.
गुन्हे प्रकटीकरण कक्ष :
- गुन्हे प्रकटीकरण युनिट क्रमांक १,२,३ आणि ४
- गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी प्रभारी म्हणून कार्यरत आहेत.
- गुन्हे प्रकटीकरण युनिट क्र. १ ते ४ हे सत्य स्थितीत, नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रात कार्यरत आहे.
- गुन्हे प्रकटीकरण युनिट क. १ ते ४ हे नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रात तसेच कार्यक्षेत्राबाहेरील गुन्ह्यांमध्ये, पोलिस उप आयुक्त (गुन्हे) यांच्या पूर्व परवानगीनेच समांतर तपास करतात
- हे युनिट मुख्यत्वे खून, खूनाचा प्रयत्न, अग्निशस्त्राचा उपयोग करुन घडणारे गुन्हे, अमली पदार्थ विरोधी कारवाया, संघटीत वाहन चोरी, अंडरवर्ल्ड संघटना, संघटीत गुन्हे, दरोडखोरांची टोळीवर कारवाई, यासारख्या गंभीर गुन्ह्यांच तपास करतात,
- अश्या गुन्ह्यांची व्याप्ती व जटीलता अधिक असल्यामुळे विशेष प्राविण्य असलेले समर्पित अधिकारी व अंमलदार यांची निवड केलेली आहे
प्रशासन कक्ष गुन्हे शाखा :
- प्रशासन कक्षाचे कामकाज पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी प्रभारी म्हणून कार्यरत आहे.
- प्रशासन कक्षामार्फत खालील जबाबदाऱ्या पार पाडल्या जातात :
- गुन्हे सांख्यिकी व अभिलेख गुन्हे शाखांतर्गत तपासावर असलेल्या व नोंद नोद झालेल्या गुन्ह्यांची माहिती व अभिलेख व्यवस्थित ठेवणे.
- मुद्देमाल जतन - गुन्हे शाखांतर्गत तपासावर असलेल्या व नोंद गुन्ह्यांतील कागदपत्रे तसेच जप्त मुद्देमालाची नोंदणी व सुरक्षित जतन करणे.
- सी.सी.टी.एन.एस. प्रणाली अद्ययावत माहितीची तपासणी व देखरेख करणे.
- प्रत्यार्पण शाखा परदेशात गेलेल्या आरोपीना कायदेशीर प्रक्रियेद्वारे ताब्यात घेणे तसेच लुकआऊट नोटीस / एल.ओ.आय. जारी करणे.
- मापन व संकलन कक्ष/अंगुली मुद्रा शाखाःसदर कक्षामध्ये गुन्हेगारांच्या बोटांचे ठशांचे संकलन, जतन व तपासणी करून त्यांची ओळख पटविणारी यंत्रणा या स्वरुपाचे कामकाज करण्यात येते.
अंमली पदार्थ विरोधी कक्ष :
अमली औषध व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम, 1985 अंतर्गत हेरॉईन, गांजा, मॉर्फीन, चरस, हॅशिश तेल, कोकेन, मेफेड्रोन, एल.एस.डी., केटामिन, अॅफेटामिन आदी अंमली पदार्थाचे उत्पादन, वाहतूक, साठा व विक्री करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी युनिट कार्यरत आहे. तसेच या युनिटमार्फत शाळा व महाविद्यालयांमध्ये अंमली पदार्थाचे दुष्परिणाम याविषयी जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येतात. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे कामकाज राहतील:
1. अंमली पदार्थ विक्रेत्यांची माहिती घेऊन कायदेशीर कारवाई
2. अमली पदार्थाच्या पुरवठा साखळीचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई
3. जामिनावर सुटलेल्या आरोपीवर सतत निगराणी
4. निर्मिती, वाहतूक व विक्री संदर्भातील गोपनीय माहिती संकलित करुन कारवाई.
5. गुन्हेगार व टोळ्यांचे अभिलेख तयार करणे.
6. न्यायालयीन प्रकरणांचा दोषसिद्धीसाठी पाठपुरावा.
7. अमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रम राबविणे.
मीरा-भाईदर व वसई-विरार पोलीस आयुक्तालय क्षेत्रात अंमली पदार्थ विरोधी कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी दोन स्वतंत्र अंमली पदार्थ विरोधी पथक कार्यरत आहेत.
१) मीरा-भाईदर अमली पदार्थ विरोधी पथक
कार्यक्षेत्र: परिमंडळ क्र. 1
२) वसई-विरार अंमली पदार्थ विरोधी पथक
कार्यक्षेत्र: परिमंडळ क्र. २ व ३
अंमली पदार्थ विरोधी पथकात पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी प्रभारी म्हणून कार्यरत आहेत.
खंडणी विरोधी पथक :
- पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी प्रभारी म्हणून कार्यरत आहेत.
- पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात गंभीर स्वरुपाच्या खंडणी प्रकरणांचा सखोल तपास करून अशा गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी स्वतंत्र खंडणी विरोधी पथक कार्यान्वित करण्यात आले आहे.
- हे पथक खंडणीसंबंधी गुन्ह्याची माहिती गोळा करुन, गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवून, प्रभावी कारवाई करते.
- खंडणी विरोधी पथकांतर्गत दहशतवादविरोधी शाखा कार्यरत आहे.
महिला अत्याचार प्रतिबंध / विशेष बाल संरक्षण व काळजी कक्ष :
महीला पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी प्रभारी म्हणून कार्यरत आहेत.
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयामध्ये महिला अत्याचार प्रतिबंध कक्ष / विशेष बाल संरक्षण व काळजी कक्ष कार्यान्वित आहे.
महीला व अत्याचार प्रतिबंध / विश बाल संरक्षण व काळजी कक्षाचे कामाची कार्यपध्दती पुढीलप्रमाणे आहे.
1. महिला व बालकांवरील गुन्ह्यांचा आढावा घेणे व दोषारोपपत्र पाठपुरावा करणे.
2. महिलांवरील अपराध सिद्धता वाढविण्यासाठी उपाययोजना करणे.
3. महिलांवरील अत्याचार संदर्भातील केंद्र-राज्य पारित केलेल्या अधिनियमांची अंमलबजावणी करणे.
4. महिलांवरील गुन्ह्यांच्या तपासासाठी संबंधितांना प्रशिक्षण देणे.
5. महिलांच्या संरक्षणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे.
6. महिलांवरील अत्याचारांविषयी जागरुकता मोहिमा, कार्यशाळा व चर्चासत्र आयोजित करणे.
7. स्वयंसेवी संस्थांशी महिलांच्या संरक्षणासंबंधी समन्वय व सहकार्य करणे.
8. महिलांवरील गंभीर गुन्ह्यांचा तपास करणे.
महीला व अत्याचार प्रतिबंध / विश बाल संरक्षण व काळजी कक्षांतर्गत हरविलेली व्यक्ती / बालके शाखा कार्यरत आहे.
ईमेल आयडी:-
crimeunit1.mb-vv@mahapolice.gov.in
atc.mb-vv@mahapolice.gov.in
pi.centralunit.mb-vv@mahapolice.gov.in
pi.mob.mb-vv@mahapolice.gov.in
crimeunitvasai.mb-vv@mahapolice.gov.in
crimeunit3.mb-vv@mahapolice.gov.in
anc.mb-vv@mahapolice.gov.in
acp.crime.mb-vv@mahapolice.gov.in